23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriअखेर मागणी झाली मंजूर-निर्णयाचे स्वागत

अखेर मागणी झाली मंजूर-निर्णयाचे स्वागत

मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी मधील उपकेंद्राला रत्नागिरीचे सुपुत्र असलेले थोर लेखक, चरित्रकार आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त धनंजय कीर यांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. मागील काही वर्षापासून धनंजय कीर यांचे सुपुत्र डॉ. सुनीत कीर आणि नातू डॉ. शिवदीप कीर यांच्यासह अनेक रत्नागिरीतील मंडळीनी मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणीवर जोर धरला होता. डॉ. धनंजय कीर यांचा भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहण्यात हातखंडा होता. आजही त्यांची अनेक पुस्तके ग्रंथालयामध्ये वाचनास उपलब्ध आहेत.

मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्य्यक संचालक आणि डॉ. धनंजय कीर यांचे रत्नागिरीतील शेजारी जयू भाटकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहाराद्वारे डिसेंबर २०२० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने हा विषय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे येत असून त्या विभागाकडे तुमची मागणी पाठविल्याचे कळवले. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये नाम. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल योग्य ती आणि त्वरित कार्यवाही करण्याबाबत आवाहन केले. नाम. सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारची मागणी केल्याबद्दलची माहिती दिली, जयू भाटकर यांच्या मागणीचे पत्र त्याआधीही वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते. त्यानंतर ११ जानेवारीला मुंबई विदयापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यानाही पत्र दिले होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापक कौन्सिलने रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला.

दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले आहेत. त्याच प्रमाणे रत्नागिरीतील भंडारी समाजातील भंडारी युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री. निलेश नार्वेकर, सल्लागार श्री. गजानन पाटील आणि सदस्यांनी नाम. उदय सामंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून नामकरणाची मागणी मंजूर घेतल्याने आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular