26.7 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024

सहलींच्या परवानगीत शाळांची दमछाक – शासकीय नियमावली

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे महिने शैक्षणिक सहली,...

कोकणात समुद्रकिनाऱ्यावर गाड्या नेणे धोकादायक

नाताळच्या सुटयांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ वाढला असून,...

हापूसच्या उत्पादनात रत्नागिरी देशात ब्रँड

केंद्र शासनाच्या 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अॅवॉर्ड...
HomeRatnagiriगुहागर येथील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

गुहागर येथील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी ता. गुहागर येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

ऑनलाईन खरेदी वाढल्याने, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक खोटे फोन, आकर्षक स्कीम्स, बँकेतून बोलतो आहे, असे एक ना अनेक प्रकारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात देखील गुहागर हेदवी मध्ये अशाच प्रकारचा खोटा फोन करून एका वृद्धाला फसविण्यात आले आहे.

कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी ता. गुहागर येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. केसरी विश्वनाथ नागवेकर असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या फसवणुकीबाबत केसरी विश्वनाथ नागवेकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. विश्वनाथ नागवेकर यांच्या पत्नीने ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गुगलवर सर्च करुन कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर त्यांनी फोन करुन कुरिअरबाबत माहिती विचारली. त्यानंतर फोनवरील अज्ञात व्यक्तीने कुरियर करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन दोन रुपये पाठवा, असे सांगून त्यासाठी लिंक पाठवली. ही लिंक पत्नीने पती विश्वनाथ नागवेकर यांना पाठवली.

नागवेकर यांनी पाठविलेल्या लिंकवर नाव, खाते क्रमांक आणि युपीआय पिन अशी सर्व माहिती भरली. त्यानंतर बँकेच्या खात्याला नोंद असलेल्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी तो अज्ञात व्यक्तीबरोबर शेअर केला. आणि त्यानंतर थोड्याच वेळात नागवेकर यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून प्रथम ४९,९९९ आणि त्यानंतर लगेचच पुन्हा ४४ हजार असे एकूण ९२,९९९ रुपये खात्यातून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी फिर्याद नोंदवली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

RELATED ARTICLES

Most Popular