28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeRatnagiriएस.टी.कर्मचार्यांनी लसीकरण आगारात करण्याची मागणी

एस.टी.कर्मचार्यांनी लसीकरण आगारात करण्याची मागणी

डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय सेवा बजावणारे इतर कर्मचारी, पोलीस, एस.टी वाहक चालक, इतर कर्मचारी यांची गणना कोविड काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून केली जाते. स्वत:च्या जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहून नक्कीच अभिमान वाटतो. कोरोना निर्बंधित लसींची सुरुवात सर्व प्रथम या फ्रंटलाईन वर्कर्स पासून करण्यात आली. लसीकरण वेगवान रीतीने होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे. त्यामुळे टप्याटप्याने होणार्या लसीकरणाचा लाभ सर्वाना हळू हळू मिळत आहे.

दापोली परिवहन मंडळामध्ये सद्याच्या घडीला एकूण ३९३ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ५०% लसीकरण पूर्ण करण्यासाठी कर्मचार्यांसाठी दापोली आगरामध्येच लसीकरणाची मोहीम राबवण्यात यावी असे आवाहन दापोली एस.टी कर्मचार्यांनी केले आहे. सध्या एस.टीच्या स्थानिक आणि लांबच्या पल्ल्याच्या बस फेऱ्यासुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहक आणि चालकांचा सतत संपर्क विविध प्रकरच्या प्रवाशांशी येत असतो. चुकून एखाद्या वेळी जर कर्मचार्यांपैकी कोणाला कोरोनाचे संक्रमण झाले तर संपूर्ण विभागासकट कुटुंबियांना तो त्रास निस्तरावा लागतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना पण उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण हे एकाच ठिकाणी आगारात करण्यात यावे असे सर्व कर्मचार्यांनी मागणी केली आहे.

msrtc front line worker vaccine

लसीकरणाचे शेड्युल ऑनलाईन असल्याने आणि कामाचे तास आणि लसीकरणाची वेळ आणि दिवस यांचे समीकरण जुळून न येत असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या आगारातच लसीकरण करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अगदीच लस न घेण्यापेक्षा लसीचा एक डोस घेतल्याने जर झालीच लागण तर निदान होणारा त्रास तरी कमी असेल एवढा विचार मनात ठेवून लसीकरणाचा उद्देश साध्य करण्याचा हेतू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular