23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeMaharashtraमहाराष्ट्र दिनाचे औचित्य, दहा रेल्वे गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य, दहा रेल्वे गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार

डिझेलवर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या, आता विजेवर सुरू केल्यानंतर वर्षाला तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांसाठी दिलासाजनक बातमी आहे. कोकण रेल्वेचा मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात येत्या १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोकणकन्या, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मांडवी आणि मंगला एक्सप्रेससह एकूण दहा गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगाने होणार आहे.

१ मे पासून मांडवी,जनशताब्दी, कोकणकन्या, मस्त्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्सप्रेस, मडगाव पॅसेंजर, मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, दोन राजधानी एक्सप्रेस या गाड्या विजेवर धावणार आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. डिझेलवर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या, आता विजेवर सुरू केल्यानंतर वर्षाला तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकण रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल कोकण रेल्वेचे तोंडभरून कौतुक करत अभिनंदन केले आहे. आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून पहिल्या टप्यात दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदुषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.

संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर मागील ६ ते ७ वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या काही महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव -थिवीम या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या मार्गांची तपासणी करून त्यावर यशस्वी ट्रायल देखील घेतली होती. त्याच्या आधी कारवार-ठोकूर आणि रोहा-रत्नागिरी या टप्प्यांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजिनावर चालवली जाते. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular