25.3 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeCareerमुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती

मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती

अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला ७५ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिके अंतर्गत सल्लागार (Consultant), बालरोगतज्ञ (Pediatrician), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager), मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी दिलेल्या मुदतीपर्यंत ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

कन्सल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस/एमडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कन्सल्टंट पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७३ हजार ५०० रुपये पगार दिला जाणार आहे.

बालरोगतज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस/एमडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बालरोगतज्ञ पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

पब्लिक हेल्थ मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थेतून एमबीए/एमपीएचपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३२ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

मानसोपचारतज्ज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस/एमडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रूम. नं. १३ गं.द आंबेकर रोड, परेल या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ६ मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

RELATED ARTICLES

Most Popular