26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeTechnologyTruecaller कडून यूजर्सना मोठा धक्का, एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होणार बंद

Truecaller कडून यूजर्सना मोठा धक्का, एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होणार बंद

Truecaller अ‍ॅपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे

मोबाईल मध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅपचा वापर अनेक जण करताना दिसतात. त्यातील Truecaller हे सर्वांच्याच मोबाईलमध्ये कॉलर आयडेंटिफिकेशनसाठी असते. या Truecaller अ‍ॅपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Truecaller स्वत: याबद्दल आपल्या युजर्सना माहिती दिली आहे, की येत्या महिन्यापासून वापरकर्ते अ‍ॅपवरून व्हॉईस कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. Truecaller ने एक नवीन घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते ११ मे पासून अ‍ॅपद्वारे त्यांचे कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. Truecaller ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत कॉल रेकॉर्डिंग फीचर सर्व यूजर्ससाठी मोफत होते, पण आता हे फीचर अ‍ॅपमधून पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहे.

Truecaller ने अचानक हे पाऊल का उचलले? असा जर प्रश्न पडत असेल, तर यामागे गुगलची नवीन प्ले स्टोअर  पॉलिसी आहे. त्यानुसार, रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी API ची विनंती केली जाऊ शकत नाही, याचा अर्थ अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी परवानग्या मिळवण्याचा पर्याय नसेल.

Truecaller आणि इतर संबंधित अ‍ॅप्सवरून हे वैशिष्ट्य काढून टाकल्यानंतर कॉल रेकॉर्ड करणे अशक्य वाटत असले तरी, तसे बिलकुल नाही आहे. जर स्मार्टफोनचा वापर करत असाल तर त्यामध्ये कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा आधीपासूनच असते, फक्त त्या पर्यायाची माहिती करून घेऊन वापर करणे आवश्यक आहे. हा बदल फक्त थर्ड पार्टी अ‍ॅपसाठी करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular