26.1 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriमालगुंड समुद्रकिनारी २५१ पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात झेपावली

मालगुंड समुद्रकिनारी २५१ पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात झेपावली

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड किनारी यंदापासून ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन वन विभागाच्या मॅग्रुव्हज फाऊंडेशनच्या पुढाकाराने चालु आहे.

कोकणातील विविध किनार्‍यांवर अनेक ऑलिव्ह रिडले कासवं विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येतात. तालुक्यातील मालगुंड येथील गायवाडी किनार्‍यावर १६ फेब्रुवारी २०२२ ला ऑलिव्ह रिडलेचे पहिले घरटे बांधले आहे. हा किनारा विस्तीर्ण आणि शांत असल्यामुळे अनेक कासवं अंडी घालण्यासाठी येतात.

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड किनारी यंदापासून ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन वन विभागाच्या मॅग्रुव्हज फाऊंडेशनच्या पुढाकाराने चालु आहे. येथील कासवमित्र ॠषिराज जोशी हे संवर्धनाचे काम करत असून ११ हॅचरी किनार्‍या झाल्या आहेत. आतापर्यंत २५१ कासवांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वाळूचा पृष्ठभाग कडक झाल्याने पिल्लं आत मध्येच अडकून मृत होण्याची भिती होती;  मात्र ॠषिराज यांनी व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे काही पिल्लांना जीवनदान मिळाले आहे.

या पुर्वीही या किनार्यावर कासवे अंडी घालून येऊन जात होती;  परंतु त्यांची अंडी वन्यप्राण्याकडून नष्ट केली जात होती. याबाबतची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्यानंतर कासव संवर्धनासाठी मालगुंड येथील सर्पमित्र ॠषीराज जोशी यांना विचारणा करण्यात आली. ॠषीराजनेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत काम करण्यास सुरुवात केली. मालगुंड येथील किनार्‍यावर समुद्राचे पाणी येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी हॅचरी करण्यात आली आहे.

आतापर्यंत २५१ पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात झेपावली आहेत. पिल्लं अंड्यातून बाहेर पडली की वाळूत खड्डा तयार करतात. त्यामुळे पृष्ठभागाकडील बाजू थोडीशी आतील बाजूस दबली जाते. वाळूवर पाऊस पडल्यामुळे किंवा अधिक दव पडला की वाळू कडक बनते. यंदा अवकाळी पावसामुळे हा प्रकार घडल्याचे निरीक्षणही कासवमित्रांनी मालगुंड येथे नोंदवले आहे.

हॅचरी केलेल्या वाळूत झालेले बदल लक्षात आल्यानंतर त्यावर परडी टाकून ठेवण्यात आली त्यामुळे पुढे दोन दिवसामध्ये पिल्ले बाहेर पडली. परडी असल्यामुळे पिल्ले एकाच ठिकाणी राहतात. परिणामी त्यांना समुद्रात सुरक्षितरित्या सोडणेही शक्य होते.

RELATED ARTICLES

Most Popular