30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeKhedखेड येथे विदेशी दारू विकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

खेड येथे विदेशी दारू विकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

खेड तालुक्यातील माणी देऊळवाडी येथे विदेशी दारु विकणाऱ्यावर धाड टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक वेळा बेकायदेशीर रित्या दारू विक्रीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे असे मनसुबे उधळण्यात यश आले आहे. शेजारील राज्यातून विदेशी प्रकारची स्वस्तामध्ये मिळणारी दारू आणून त्याची रत्नागिरीमध्ये त्याची चढ्या दराने विक्री केली जाते. परंतु अशी विक्री बेकायदेशीर रित्या असल्याने, पोलीस अशा गुन्हेगारांच्या कायम मागावर असतात. खेडमध्ये अशीच एक घटना घडल्याने, पोलिसांनी वेळीच धाड घातल्याने गुन्हेगाराला मुद्देमालासहीत ताब्यात घेण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील माणी देऊळवाडी येथे विदेशी दारु विकणाऱ्यावर धाड टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दिलीप धोंडू कदम असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.

माणी देऊळवाडी येथे विदेशी दारू विकली जात असल्याची माहिती खेड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळाली होती. या माहितीनुसार सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिलीप कदम याच्या घरी धाड टाकली असता त्यांना ११ हजार रुपये किमतीचे विदेशी दारू मिळून आली

खेड पोलिसांनी ही दारू जप्त करून दारूची विक्री करणारा दिलीप कदम याला ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यात सुजित गड्दे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड तालुक्यात अनेक अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली आहे. यामध्ये गावठी दारू, विदेशी दारू विक्रेत्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तालुक्यात अवैध गांजा विकणाऱ्यांवरही कारवाई केली असून अनेकांना गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू आणि गांजा व्यवसाय करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular