28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriगेल्या ३ दिवसापासून आंब्याची रेल्वे वाहतूक बंद, बागायतदार हवालदिल

गेल्या ३ दिवसापासून आंब्याची रेल्वे वाहतूक बंद, बागायतदार हवालदिल

रत्नागिरीच्या हापूस आंबा बागायतदाराची थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे,  तसेच ग्राहक कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला अनेक राज्यातून, अगदी देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. अनेक आंब्यांची पार्सल हि रेल्वे मार्फत देखील पाठवली जात आहेत. परंतू, सध्या असलेल्या रेल्वेच्या गर्दीमुळे वेळेत बागायत दारांकडून पाठवलेली पेट्यांची पार्सल अजून देखील स्टेशन वरच आहेत. त्यामुळे जर आंबा खराब झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.

त्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानक प्रमुखांना पत्र लिहत ग्राहक कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. या पत्राद्वारे तब्बल २ लाख २४ हजार ४०० रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या हापूस आंबा बागायतदाराची थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे,  तसेच ग्राहक कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. याचं कारण गेल्या ३ दिवसापासून हापूस आंब्याची वाहतूकच न झाल्याने आंबा खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत आंबा बागायतदारांनी कोकण रेल्वेकडून आंबा वाहतूक देखील केली जाते.

पण आता कोकणातील आंबा शेतकऱ्याने थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नियमानुसार पैसे भरले पण हापूसची वाहतूक कोकण रेल्वेमार्फत वेळेत केली गेली नाही. परिणामी नुकसान होणार असून २ लाख २४ हजार आणि ४०० रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा ग्राहक मंचाकडे दाद मागितले जाईल अशा आशयचे पत्र समीर दामले या शेतकऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानक प्रमुखांना लिहले आहे.

त्याचप्रमाणे कोकणातील हापूस दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाठवायचा आहे. त्यासाठी कोकण रेल्वेची मदत घेतली गेली. त्यामुळे हापूस आंबा शेतकऱ्याने थेट पत्र लिहत नुकसान भरपाईची मागणी करत ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular