हल्ली एकाच प्रकारच्या कामाचा, एकाच कंपनीचा, एका ठिकाणी काम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. जास्तीत जास्त ४-५ वर्षे एका ठिकाणी काम केले जाऊ शकते अशी हल्लीच्या नोकरदारांची संज्ञा बनली आहे. त्यामुळे एका कंपनीचा अनुभव घेतल्यानंतर जास्त पगार तिथे लगेचच जॉईन होतात. पण एका माणसाची नोंद मात्र एकाच कंपनी मध्ये ८० वर्षापेक्षा अधिक वर्ष काम केल्याबद्दल करण्यात आली आहे.
वॉल्टर ऑर्थमन हे आता १०० वर्षांचे आहेत. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये करण्यात आली आहे वॉल्टर ऑर्थमनी ब्राझीलमधील एका टेक्सटाईल कंपनीत ८० वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. एका सेल्स मॅनेजरच्या नावावर एकाच कंपनीत सर्वाधिक काळ त्यांनी नोकरी करत विक्रम केला आहे.
एक शिपींग असिस्टंट म्हणून १०० वर्षांचे वॉर्टल यांनी इंडस्ट्रियाज रीनॉक्स एसए कंपनीमध्ये काम सुरु केले. दरम्यानच्या काळात कंपनीने नाव बदलून रीनॉक्सव्यू असेही करण्यात आले. सध्या त्यांच्या या विक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
सहसा एकाच कंपनीत नोकरी करायला लोक त्रासतात. मात्र एका वॉल्टर ऑर्थमन नावाच्या व्यक्तीने चक्क या एकाच कंपनीत तब्बल ८४ वर्षे काम करून विक्रम बनविला आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्येही करण्यात आली आहे. या व्यक्तीचे वय शंभर वर्षे असून त्यांनी हा जगावेगळा रेकॉर्ड या वयामध्ये बनवला आहे.
सहसा एकच काम करुन अनेक जण कंटाळतात. मात्र अशा लोकांना वॉल्टर ऑर्थमन यांनी आश्चर्यचा धक्का दिला आहे. जॉब म्हटले की ठराविक वयानंतर निवृत्ती ही आलीच. ही निवृत्ती घेण्याचे वयही ठरलेले असते. असे असले तरी काही लोक मात्र ज्या पद्धीतने नोकरी करतात कि कंपनी देखील ठराविक वयानंतर देखील त्यांना सोडायला तयार नसते हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. त्यातीलचं एक विक्रमी उदाहरण म्हणजे वॉल्टर ऑर्थमन.