25.9 C
Ratnagiri
Monday, August 8, 2022

गोठणे-दोनिवडे गावात, थेट घरात बिबट्याने केली एन्ट्री

राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात मुक्तपणे संचार...

तुफानी पावसामध्ये देखील मिशन हर घर तिरंगा जनजागृती सायकल रॅली यशस्वी

रत्नागिरीत मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी...

जिल्ह्यात पुढील ४८ तास रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे....
HomeTechnologyव्हॉट्सॲपचे नवीन आणि आकर्षक फीचर्स उपलब्ध

व्हॉट्सॲपचे नवीन आणि आकर्षक फीचर्स उपलब्ध

आजच्या काळात व्हाट्सॲप वापरत नाही असा क्वचितच कोणी सापडेल.

व्हॉट्सॲप हा जीवनातील मुलभूत गरजा आहेत त्यापैकी एक बनला आहे. सोशल मिडिया मधील सर्वात जास्त वापरले जाणारे हे ॲप आहे. त्यामुळे वापरकर्ते यामध्ये नवनवीन फीचर्स कोणती अपडेट होतात याची आतुरतेने वाट बघत असतात. आणि ज्या ॲपला फीचर्स जास्त त्याचे युजर्स जास्त असतात हे समीकरणच बनलेले आहे. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून युजर्सना जोडून ठेवण्यासाठी कंपनीचे सीईओ नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देत असतात.

व्हॉट्सॲप हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. जगभरात व्हाट्सॲपचे सुमारे २०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. आजच्या काळात व्हाट्सॲप वापरत नाही असा क्वचितच कोणी सापडेल. या ॲपच्या मदतीने क्षणार्धात मेसेज, फोटो-व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्सही कुठून कुठेही शेअर करता येतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ख्याती असलेले व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर आणत असतात.

आता व्हॉट्सॲप कंपनी रिॲक्शन फीचरसह मार्केटमधील इतर ॲप्सशी स्पर्धा करणार आहे. अनेक दिवसांपासून व्हॉट्सॲप यूजर्स या फीचरची वाट पाहत होते आणि आज ही प्रतीक्षा संपणार आहे. फेसबुक प्रमाणेच आता व्हॉट्सॲपच्या मेसेजेसना देखील इमोजी उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचर्सनुसार युजर्स इमोजीच्या मदतीने मॅसेजवर त्यांचा अभिप्राय देऊ शकतील. आत्ता सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला फक्त ६ इमोजी मिळतील ज्यात लव, लाईक, लाफ, थैंक्स, सरप्राइज आणि दु:खी असे इमोजींचा समावेश असेल. पण येत्या काळात सर्व इमोजी असणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले की, आजपासून व्हॉट्सॲप रिॲक्शन फीचर युजर्सला दिले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular