26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपुन्हा एकदा मोरया स्पोर्ट्स मदतीला धावला, गणपतीपुळेत तिघांना जीवदान

पुन्हा एकदा मोरया स्पोर्ट्स मदतीला धावला, गणपतीपुळेत तिघांना जीवदान

पाण्यात बुडत असताना किनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टस्‌चे सदस्यांनी स्पीड बोटीच्या मदतीने त्वरित बुडणाऱ्या व्यक्तींना सुखरूप पाण्यातून बाहेर कडून किनाऱ्यावर आणले.

रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक ठिकाणाहून पर्यटक गणपतीपुळे मध्ये दाखल होतात. आणि कोकण किनारपट्टी व्यतिरिक्त इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे कसलाही मागचा पुढचा विचार न करता हे पर्यटक समुद्राच्या पाण्यात मज्जा करण्यासाठी उतरतात. मागील आठवड्यातच काही पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडताना वाचविण्यात आले आहे.

अशीच घटना काल गणपतीपुळे येथे पुन्हा घडली असून, समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना मोरया स्पोर्टस्‌ स्पीड बोट चालकांनी वाचवले. तिन्ही पर्यटक इचलकरंजी जि. कोल्हापूर येथील आहेत. ही घटना सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास घडली. जीवरक्षकाअभावी येथील किनाऱ्यावर येणारे पर्यटक असुरक्षित मानले जात आहेत.

एक तर समुद्रात घोंघावणारे असनी चक्रीवादळाचा धोक्यामुळे कोकण किनारपट्टीवरील वातावरण बदलले असून समुद्र खवळलेला आहे. इचलकरंजीतील विकास जाधव वय ४६,  संजना जाधव ४०, अंचल करंजे वय २१ देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लाटेसोबत तिघेही खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोल पाण्यात जाऊ लागले. पाण्याला असलेला वेग आणि लाटांमुळे त्यांना माघारी किनाऱ्यावरही परतता येत नव्हते. ते बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडत असताना किनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टस्‌चे सदस्यांनी स्पीड बोटीच्या मदतीने त्वरित बुडणाऱ्या व्यक्तींना सुखरूप पाण्यातून बाहेर कडून किनाऱ्यावर आणले.

वेगवान लाटांमुळे स्पीडबोट चालकांनाही बुडणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळा येत होता. हा प्रकार समजल्यानंतर गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार मधुकर सलगर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. समुद्र खवळलेला असून लाटांचा आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने त्यात पोहणे, एका जागी थांबणे  जिकिरीचे बनते. किनारी भागात खड्डे पडले असून वाळू वेगाने सरकत आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्थानिकांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, परंतु प्रत्यक्षरित्या हे घडत नसल्याने अशा घटना घडतात.

RELATED ARTICLES

Most Popular