32.2 C
Ratnagiri
Thursday, May 16, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeDapoliकोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन

कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन

विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनात पाहणी करुन शेतकरी व इतर सहभागी स्टॉल्सला भेट देवून माहिती घेतली. विद्यापीठात परिसरात भ्रमंतीसाठी इलेक्ट्रीक वाहन घेण्यात आले होते. यात बसून राज्यपाल महोदयांनी याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  कृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदिंची व्यासपीठावर उपस्थित होते. इतर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम तसेच या प्रदर्शनाचे प्रायोजक पितांबरी समुहाचे रविंद्र प्रभूदेसाई आदिंचा समावेश होता.

रत्नागिरी जिल्हयाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्हयाची ओळख संपूर्ण जगास विशेष करून हापूस आंब्यामुळे झाली आहे. सध्या हापूसचा मोसम देखील सुरु झाला आहे. या पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या त्यानुसार, प्रथम श्वेतक्रांती, हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

जिल्हयात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकाची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular