27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriमिर्‍यावासिय यावर्षीही देखील समुद्राच्या अजस्त्र लाटांचा भीतीच्या सावटाखाली

मिर्‍यावासिय यावर्षीही देखील समुद्राच्या अजस्त्र लाटांचा भीतीच्या सावटाखाली

पावसाळा केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, ५० ते ६० मिटरचे बांधकाम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही.

पावसाळ्यात दरवर्षी दरवर्षी भेडसावणारी समस्या टाळण्यासाठी तब्बल १६९ कोटींचा बंधारा उभारण्याला शासनाने मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते या बंधार्‍याचे भूमिपूजन झाले. स्थानिक आमदारांसह पालकमंत्री बंधार्‍याच्या कामाकडे लक्ष देणार आहे का, असा सवाल पांढरा समुद्र ते मिर्‍या मोर टेंबे आलावा बंधारा समितीचे अध्यक्ष शांताराम उर्फ अप्पा वांदरकर यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील मिऱ्या गावाचे दरवर्षीचे संकट अजून जैसे थेच आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये संपुर्ण मिऱ्या गाव भीतीच्या सावटाखाली राहत आहे. मिऱ्या गावाला लाभलेला विस्तृत समुद्र किनाऱ्यामूळे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. अनेक प्रकारचे पर्यटन उपयोगी उपक्रम तिथे राबविले जात आहेत, त्यामुळे स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होत आहे.

परंतु, याच समुद्राची पावसाळ्यामध्ये स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. अतिवृष्टीमुळे दरवर्षी होणारी प्रतिबंधक बंधाऱ्यांची धूप, स्थानिकांच्या घरामध्ये, बागांमध्ये होणारे समुद्राच्या पाण्याचे अतिक्रमण यामुळे मिऱ्यावासिय त्रस्त झाले आहेत.

२६ डिसेंबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १६९ कोटीच्या मिऱ्या बंधाऱ्याचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार पडला. परंतु, इतके महिने उलटून गेले तरी सामान तिथे येऊन पडले असले तरी, आणि मुख्य म्हणजे पावसाळा केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, ५० ते ६० मिटरचे बांधकाम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जर परिस्थिती अशीच राहिली तर मिऱ्यावासियांची झोप उडणार आहे.

या बंधाऱ्याच्या कामासाठी ज्या काळेत्री दगडाची आवश्यकता आहे त्याऐवजी गोट्या दगडांचा वापर करण्यात आल्याने, पाण्याचा होणारा मानवी वस्तीतील शिरकाव रोखणे कठीण बनत आहे. टेट्रापॅडचा वापर सुद्धा समुद्राचे अतिक्रमण रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु, त्यावर गंभीरपणे विचार केला जात नाही.

RELATED ARTICLES

Most Popular