रत्नागिरीमध्ये शैक्षणिक व्यवस्था उत्तम दर्जाची असून, आता त्यामध्ये नवीन ५ शैक्षणिक प्रकल्पांची भर पडणार असून रत्नागिरीची शिक्षण व्यवस्थेमध्ये चार चांद लागणार आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकच शासकीय विधी महाविद्यालय असून, आणि देश पातळीवर सुद्धा ते एकच सरकारी विधी महाविद्यालय आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील आर्थिक कारणामुळे, अथवा ग्रामीण भागामध्ये नसलेल्या उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी पुढील वर्षी रत्नागिरीमध्ये सरकारी विधी महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा नाम. सामंतांनी केली आहे.
त्याचप्रमाणे कलेक्टर, पोलीस अधीक्षक अशा क्लास १ अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असलेले स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही केंद्रांना शासनाची मंजुरी मिळाली असून, रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांनी लागणारा २५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. कवी कालिदास यांचे कला केंद्र तसेच उर्दू भाषेसाठी एक केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे नाम. उदय सामंत यांनी सांगितले.
प्रत्येक विभागाला त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे नाव देण्यात येणार असून, त्या व्यक्तीचा त्या क्षेत्रातील अभ्यास, साहित्य, मान आणि त्यासंदर्भातील त्यांचे असणारे योगदान लक्षात घेऊन सर्वांच्या मतांचा विचार करून त्याप्रमाणे विभागाचे नामकरण करण्यात येईल. त्यामुळे रत्नागिरीमध्ये नवीन काही सुरु होणार म्हटल्यावर ते न होण्यासाठी किंवा श्रेयवादावरून राजकारण पेटते, त्यामुळे निदान या प्रकल्पामध्ये तरी कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्यात येऊ नये, असे नाम. सामंतानी स्पष्ट केले.