24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKokanमान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्येच कोकणात दाखल होण्याची शक्यता

मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्येच कोकणात दाखल होण्याची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे

मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्येच दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. यंदा असनी  चक्रीवादाळामुळे वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. भारतीय हवामान विभागाकडून सध्या मोसमी वाऱ्यांसाठी स्थिती अनुकूल निर्माण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्व मोसमी पाऊस होत असून,  राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊसधारा बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोसमी वारे सक्रिय झाल्याने आता अंदमान-निकोबार बेटांवर धुवांधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात देखील वाऱ्यांचा प्रभाव वाढला असून,  त्यामुळे काही भागांत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या तापमानाची दुहेरी स्थिती आहे. बहुतांश भागांत अद्यापही दिवसाचे तापमान कधी उष्ण तर रात्री थंड आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती अद्याप कायम आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पाचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरणही निर्माण झाले आहे. कोकणामध्ये देखील आज सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे, परंतु, अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular