26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriपाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, धरणांची दुरुस्ती आणि निधी आवश्यक

पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, धरणांची दुरुस्ती आणि निधी आवश्यक

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या रत्नागिरी शहरामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रत्नागिरी शहराला तीन स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आणि तरीही पाण्याचा पुरवठा अपुरा पडतो. त्यामुळे त्यावर कुठेतरी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी शहराला प्रामुख्याने शीळ, पानवल व नाचणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा येते. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त पडली आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभारावी की अन्य प्रकारची, याबाबत नाशिकच्या मेरी या संस्थेकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये होणारी प्रचंड पाण्याची ओढतान लक्षात घेता त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.

पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत करावी लागते. १९६५ मध्ये रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पानवल धरणाची बांधणी करण्यात आली. धरणाच्या दुरुस्तीसाठी डागडुजीसाठी २०१६ मध्ये प्रशासन स्तरावर ९ कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. नवीन धरण बांधायचे झाल्यास सुमारे ६ वर्षे तरी लागणार आहेत. धरणाच्या दुरुस्तीसाठी या धरणाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी आता सुमारे १० कोटींची आवश्यकता लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular