27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeChiplunतरुण शेतकऱ्याचा पॉवर टिलरमध्ये अडकून मृत्यू

तरुण शेतकऱ्याचा पॉवर टिलरमध्ये अडकून मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा डेरवण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कोकणात मान्सून काहीच दिवसावर येऊन ठेपला असून, शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या नांगरणी आणि पेरणी सुरु करण्यात आली असून, शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. हल्ली शेतीसाठी यांत्रिक पद्धतींचा वापर जास्त प्रमाणात केला जात असल्याने, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावयाचा हे शेतकरी जाणून घेत आहेत. पण काही वेळेला आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे समस्या निर्माण होतात.

भात पेरणीच्या कामासाठी पॉवर टिलर चालवत असताना दोन्ही पाय सटकून ते पॉवर टिलरच्या नांगरामध्ये अडकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा डेरवण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र पांडुरंग मोरे वय-३४, मांडकी असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मांडकी गावचे हद्दीत हिरु खांबे व महेंद्र मोरे हे शेतामध्ये मिनी पॉवर टिलरने भात पेरणी व नांगरणी करीत होते.

भाताची पेरणी व नांगरणी झाल्यानंतर महेंद्र हे दुसऱ्या शेतामध्ये पॉवर टिलर नेत होते. यावेळी शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे त्याचे हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्याचे दोन्ही पाय सटकून पॉवर टिलरच्या नांगरामध्ये अडकले व ते कंबरेपर्यंत मशिनमध्ये ओढले गेले. त्यांना हिरु खांबे यांच्यासह अन्य लोकांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular