29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeSportsसौरव गांगुलीचा राजीनाम्याच्या अफवेवर अखेर खुलासा, काय आहे नवी इनिंग !

सौरव गांगुलीचा राजीनाम्याच्या अफवेवर अखेर खुलासा, काय आहे नवी इनिंग !

त्याच्या पोस्टमुळे गांगुली राजीनामा देऊन राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली. यामुळे लोकांनी अनेक अर्थ काढण्यास सुरुवात केली.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे भावूक ट्वीट गांगुली यांनी करत माहिती दिली. सौरव गांगुलीने ट्विटमध्ये अस म्हटल आहे की, २०२२ माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण, क्रिकेटमध्ये करिअर सुरु करुन ३० वर्ष पूर्ण झाली. १९९२ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. ३० वर्षांच्या प्रवासात क्रिकेट खेळत असताना सर्वांकडूनच सपोर्ट मिळाला. क्रिकेटने मला खूप काही दिले. या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे आभार. आता नव्या नवीन इनिंग सुरुवात करणार आहे. यामध्ये सर्वांचा सपोर्ट मिळेल, अशी आपेक्षा आहे.

सौरव गांगुलीच्या या पोस्टनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. त्याच्या पोस्टमुळे गांगुली राजीनामा देऊन राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली. यामुळे लोकांनी अनेक अर्थ काढण्यास सुरुवात केली. काहींनी तर असे अर्थ लावले कि, गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरणार आहे. पण काही तासात बोर्डाचे सचिव अखेर जय शहा आणि सौरव गांगुली यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

बीसीसीआयचे सचिव यांनी त्यानंतर गांगुली यांनी राजीनामा दिल्या नसल्याचे सांगितले आणि काही गोष्टींना पूर्णविराम मिळाला. पण गांगुली आता कोणती नवी इनिंग खेळणार आहे, याबद्दल मात्र कोणालाच कल्पना नव्हती. पण आता गांगुली नवीन कोणती गोष्ट करणार आहे, हे समोर आले आहे. गांगुली यांनी राजीनाम्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

क्रिकेट विश्वात काल गांगुलीच्या अचानक केलेल्या पोस्टमुळे बराच गोंधळ उडाल्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर करून तो नेमके काय करणार आहे याचे उत्तर दिले आहे. गांगुलीने “क्लासप्लस” हे नवे शैक्षणिक अॅप लॉन्च केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत गांगुलीने या अॅपचा फायदा शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना देखील होणार असल्याचा दावा केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular