28.1 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraहॉरर चित्रफित पाहून लहानग्याने घेतली फाशी

हॉरर चित्रफित पाहून लहानग्याने घेतली फाशी

कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

आठ वर्षांचा चिमुरडा ‘कमल’ बाहुलीशी खेळत होता, आई घरातील कामात व्यस्त होती. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. त्याने खेळत असताना आपल्या बाहुलीला फाशी दिली. बाहुली आपल्याला कायमची सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. कमलला मोबाईलवर ‘हॉरर’ फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

कमल खेम साऊद वय ८, रा., थेरगाव असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी  दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीसोबत खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणदेखील खेळत होती. त्यावेळी कमलची आई कामात व्यस्त होती. तर, वडील कामानिमित्त बाहेर गेले होतेत.

दरम्यान, खेळत असताना कमलने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमलने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, पोटाचा गोळा फासावर लटकलेले भीतीदायक चित्र समोर दिसले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular