25.7 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriआंजणारी घाटात दोन वाहनांचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

आंजणारी घाटात दोन वाहनांचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या अर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुण ट्रक चालकाचा जागीच गतप्राण झाला. ट्रक व अर्टिगा कारमध्ये हा भीषण अपघात झाला. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. विजेश विलास सावंत रा. पुनस, ता.लांजा असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

आंजणारी घाटात काजळी नदीच्या पुलावरून ही कार नदीच्या दिशेने उडाली. या कारमध्ये चारजण प्रवास करत होते. कार मुंबईच्या दिशेने निघाली होती. तर ट्रक गोव्याकडे निघाला होता. काजळी नदीच्या पुलावर ट्रक आणि कारचा अपघात झाला. अपघातात कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान,  हा भिषण अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात ट्रक नदीत कोसळून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघातस्थळी तत्काळ ग्रामस्थ, लांजा पोलिसांनी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरूवात केली.

चिपळूण येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे निघाले होते. तर ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. याचवेळी आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक विजय सावंत यांना आपल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक फेल झाले असल्याने आणि याच दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी गाड्यांची रहदारी असल्याने ट्रक थांबवायचा तरी कसा,  असा मोठा प्रश्न ट्रक चालक सावंत यांच्या समोर निर्माण झाला. तरी देखील मोठ्या शिताफीने त्यांनी त्याही परिस्थितीत ट्रक आंजणारी पुलापर्यंत आणला.

मात्र तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या अर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात अर्टिगा कार अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली. याबरोबरच अर्टिगा कार चालक समीर प्रदीप शिंदे त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे वय ६१ तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे वय २९ आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे वय ६५ हे दोघे जण गंभीर जखमी झाले.

RELATED ARTICLES

Most Popular