24.2 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

रत्नागिरीतील नाट्यगृह नाकापेक्षा मोती जड

रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक...

ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मालगुंडमध्ये दिमाखात अनावरण

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सुख-दु:खे, संघर्षाची गाथा आणि...
HomeRatnagiriकुटुंबातील मुलग्यासह आई -वडील ही एकाच वर्षी १२ वी उत्तीर्ण

कुटुंबातील मुलग्यासह आई -वडील ही एकाच वर्षी १२ वी उत्तीर्ण

ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होऊन तालुक्यात सर्वत्र चर्चेचा आणि सोबतच कुतूहलाचा विषय ठरली आहे.

शिक्षणाला वय नसते हे म्हणतात ते खोटे नव्हे. कोणत्याही वयामध्ये माणसाने शिकत राहावे. शिकलेले कधीही वाया जात नाही, हे आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून कायमच शिकत आलो आहोत. रत्नागिरी मधील हातखंबा येथे आई, वडील आणि मुलगा एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल व शिक्षणाप्रती असलेल्या आस्थेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

हातखंबा येथील बौद्धवाडी येथे राहणाऱ्या कांबळे कुटुंबातील तिघांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षणाचे महत्व आता केवळ शहरी भागामध्येच न राहता, ग्रामीण भागामध्येही दिसून येऊ लागले आहे. ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होऊन तालुक्यात सर्वत्र चर्चेचा आणि सोबतच कुतूहलाचा विषय ठरली आहे. नुकताच १२ वी चा निकाल लागला असून, एकाच कुटुंबातील तिघांनी परीक्षा पास झाल्याने जिथे तिथे त्यांचीच चर्चा सुरु आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर बारावी पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच रत्नागिरी तालुक्यातून एक आनंदी घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील कांबळे कुटुंबियातील तिघांनी बारावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाले आहेत. याहून विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या कुटुंबातील मुलग्यासह आई -वडील ही एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत.

राजन कांबळे (४५), रोहिणी कांबळे (४२) व रोहित कांबळे (१९) अशी या दोघा माता पिता आणि पुत्राची नावे आहेत. राजन कांबळे यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी परीक्षा दिली. तर त्यांच्या मुलासह आईने देखील वडीलाबरोबरच बारावीची परीक्षा पास केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular