28.3 C
Ratnagiri
Friday, April 4, 2025

भरणे नाक्यावरील ‘ती’ अतिक्रमणे हटवली, दंडात्मक कारवाई

भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी...

‘वाशिष्ठी’तील गाळ उपसा मोहीम थंडावली

चिपळूण शहर व परिसरात जुलै २०२१ मध्ये...

‘अदृश्य कामगार’ येणार उजेडात मंत्री सामंतांकडून आढावा

रत्नागिरी पालिकेतील मक्तेदारीवरील मलिदा खाण्याला आता लवकरच...
HomeMaharashtraअरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे राज्यात मान्सूनचे स्पष्ट संकेत

अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे राज्यात मान्सूनचे स्पष्ट संकेत

अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहेत. कोकणात २७ मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून ७ जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती अशीच राहिल्यास केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. यामुळे राज्यात वेळेवर सांत जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या कुठे आहे मान्सून नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. त्यानंतर अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular