23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलांज्यात सापडला गुटख्याचा मोठा साठा दोघांना अटक

लांज्यात सापडला गुटख्याचा मोठा साठा दोघांना अटक

जप्त करण्यात आलेल्या स्कुटरसह गुटख्याची एकूण किंमत १ लाख ७ हजार ६४० ऐवढी आहे.

अन्न व औषध प्रशासन, दहशतवादी विरोधी शाखा रत्नागिरी तसेच लांजा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी लांजा येथे गुटखा वाहतूक व साठवणूक केल्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी साफला रचून पकडण्यात यश आले आहे. स्कूटर सह १ लाख ७ हजार ६४० रू. कीमतीचा गुटखा जप्त केला असुन दोघाना दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी सहाय्यक आयुक्त दिनानाथ रावसाहेब शिंदे व दहशतवादी विरोधी शाखा रत्नागिरीचे पोलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण देशमुख, दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार विजय कदम, पोलीस हवालदार विजय चांदणे, राजेश भुजबळराव, आशिष शेलार, लक्ष्मण कोकरे, अन्न व औषध शासन रत्नागिरी अन्न सुरक्षा अधिकारी विजय सातपुते, प्रशांत गुंजाळ, लांजा पोलिस ठाण्याचे हेडकॉन्टेबल राजेंद्र कांबळे, बापूराव काटे आदी पोलीस पथकाने लांजा साटवली रोडवर महिलाश्रम येथे सकाळी १०.४५ वा. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन येथे साफला रचला होता.

तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर बारीक लक्ष ठेवून होते. सकाळी ११.३० वा. दरम्यानं स्कुटरवर पांढऱ्या रंगाच्या पिशव्या घेवून येत असल्याचे दिसून आल्याने त्याला थांबवून त्यांच्या नावाची विचारणा केली असता विनायक भास्कर शेट्ये (वय – ५२, रा. लांजा भटवाडी) असे सांगितले. पिशव्यांमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यामध्ये दुकानात देण्याचा माल आहे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये केसर युक्त, विमल पानमसाला, चौकिदार गुटखा, आर एम डी पानमसाला, सुगंधित तंबाखूच्या पुढ्या आढळून आल्या. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता घराच्या जिन्याखाली लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा आढळून आला. एकूण ४१ हजार ३४० रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.

हा गुटखा कुणाकडून आणला, याची विचारणा केली असता गोंडेसखल रोडवर असलेल्या जावेद शेखलाल पन्हळेकर यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगीतले. त्यानुसार पोलिसांनी पन्हळेकर याच्या दुकानात तसेच घरावर छापा टाकून त्याच्या घराच्या जिन्याखाली असलेल्या दोन नायलॉनच्या पिशव्यांमध्ये चौकिदार गुटख्याची पाकिटे आढळून आली. याची किंमत ६ हजार ३०० ऐवढी आहे. जप्त करण्यात आलेल्या स्कुटर सह गुटख्याची एकूण किंमत १ लाख ७ हजार ६४० ऐवढी आहे. पोलिसांनी आज केलेल्या धडक कारवाईचे जनतेतन कौतक केले जात आहे. दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular