23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeTechnologyलिंक्डइनची कर्मचार्यांना अनोखी भेट

लिंक्डइनची कर्मचार्यांना अनोखी भेट

कर्मचाऱ्यांवर सातत्याने असलेल्या कामाच्या ताणामुळे त्यापासून थोडा निवांतपणा मिळण्यासाठी आणि काही काळ शांततेने व्यतित करण्यासाठी कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोफेशनल नेटवर्क कंपनी लिंक्डइनने आपल्या जगभरातील 15,900 कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुट्टी सर्व कर्मचाऱ्यांना पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे कि, आपल्या कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये ताणविरहित राहून पुन्हा उस्फुर्तपणे काम करण्यासाठी रिचार्ज व्हावं हा निव्वळ उद्देश ही रजा देण्यामागे आहे. लिंक्डइनच्या अधिकारी तेइला हॅन्सन म्हणाल्या की, कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी मौल्यवान गोष्ट द्यायची होती आणि सध्याच्या काळात वेळ ही गोष्टच अतिशय मौल्यवान आहे असं कंपनीच्या प्रशासनाला वाटतं आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीची प्रगती करायची असेल तर कर्मचारी ताणताणाव विरहित राहून आनंदी राहणं अत्यंत गरजेच आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची भर पगारी रजा देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.

A unique gift to LinkedIn employees

कर्मचाऱ्यांवर सातत्याने असलेल्या कामाच्या ताणामुळे त्यापासून थोडा निवांतपणा मिळण्यासाठी आणि काही काळ शांततेने व्यतित करण्यासाठी कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यामध्ये आनंद व्यक्त केला जातोय. गेले वर्षभर कोरोनामुळे कंपनीचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. आता कंपनीचे सर्वच कर्मचारी रजेवर असल्याने कोणालाही कामासंबधी मेल, मीटिंगचे फोन्स किंवा इतर काही गोष्टींचा या काळात काही त्रास होणार नाही. कंपनीच्या 15,900 कर्मचाऱ्यांना रजा मिळणार असून, या काळात लिंक्डइनच्या कोअर टीमचे सदस्य काम पाहणार आहेत. हे सदस्य पुढे आवश्यकतेनुसार आपल्या वेळेप्रमाणे रजा घेणार आहेत.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या, अशा बेरोजगार लोकांना नोकरीच्या संधी विषयी माहिती देण्यासाठी पुढे सरसावलेल्या लिंक्डइन कंपनीने या काळात अनेकांना मदतीचा हात पुढे केला. त्यासाठी या कंपनीच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचे हे अविरत कष्ट पाहता त्यांना थोडे दिवसांची विश्रांती मिळण्याच्या उद्देशाने या कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लिंक्डइनने आपल्या सर्व 15,900 कर्मचा-यांच्या विश्रांतीसाठी एका आठवड्याची भर पगारी रजा देण्याचे ठरवले आहे. ही सुट्टी सर्व कर्मचा-यांना पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. आपल्यावर आलेल्या कामाच्या ताणतणावापासून थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा काम करण्यास रिचार्ज व्हावं असा उद्देश ही सुट्टी देण्या मागचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular