25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeMaharashtraनवीन संशोधन अजेंरिया शरदचंद्रजी

नवीन संशोधन अजेंरिया शरदचंद्रजी

शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नाव देण्यात आल्याचे सांगितले आहे

कोल्हापुरामधील दोन युवा वनस्पतीशास्त्र प्राध्यापक डॉ. प्रमोद लावंड आणि डॉ. विनोद शिंपले सह्याद्री पर्वतरांगेत एका नवीन वनस्पतीचा शोध लावलेला असून, या वनस्पतीचे नामकरण माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री नावाने ओळखल्या जाणार्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्री. शरद पवार यांच्या नावे केले आहे. त्यांनी या वनस्पतीच्या नावाचे नामकरण ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने केले आहे. शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नाव देण्यात आल्याचे सांगितले आहे

गेली वीस वर्ष डॉ. विनोद शिंपले यांचे नाव गारवेल कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात प्रसिद्ध आहे. अजूनपर्यंत त्यांनी नवीन पाच गारवेल कुळातील प्रजातींचा शोध लावला आहे. जगभरात त्यांच्या संशोधनाला मान्यता दिली गेली आहे. कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून अजेंरिया शरदचंद्रजी या नव्या वनस्पतीचे संशोधन नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या सुकन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही प्राध्यापकांचे त्यांच्या शोधला साहेबांचे नाव दिल्याबद्दल ट्वीट करुन आभार मानले. डॉ. प्रमोद लावंड आणि डॉ. विनोद शिंपले या दोन प्राध्यापकांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध लावला असून त्याला माननीय शरद पवार साहेबांच्या नावाने नामकरण केले असून यापुढे ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाणार असून, या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. आदरणीय साहेब महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं कायम मानतात आणि असा आदर व सन्मान केवळ एका कुटुंबाकडून मिळू शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीची संशोधन शरद पवार साहेबांच्या नावावर समर्पित केले आहे. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद’ असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे.

सह्याद्री पर्वतरांगेतील आलमप्रभू देवराईत या वनस्पतींचा शोध लागला असून ही वनस्पती 2016 मध्ये सर्वप्रथम निदर्शनास आली. तीन वर्षांच्या संशोधन काळानंतर जगात कोणत्याही भागामध्ये असे साधर्म्य आणि वैशिष्ट्य असलेली वनस्पती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेचं नवीन संशोधकांना आपल्या नाविन्यपूर्ण शोधाला स्वयंसुचीत नाव देण्याचा अधिकार असतो.व सर्व जगभरातील वनस्पतीशास्त्रज्ञ या संशोधनाचा अभ्यास करुन संशोधकाने सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब करतात. डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी शोध लावलेल्या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर महिन्यात फुले येत असून, तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात फळं येतात. ही वनस्पतीचे वर्गीकरण वेलवर्गामध्ये केले जात असून, त्या वनस्पतीला पिवळ्या रंगाची मोठी फळं येतात. या पोटजातीच्या वनस्पती मुख्य करून आशिया खंडातच आढळलयात. केवळ शंभर वेल आलमप्रभू देवराईत असल्याने त्याचे जतन करणे आवश्यक बनले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular