26 C
Ratnagiri
Sunday, January 18, 2026

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण...

रत्नागिरीत गुन्हेगारांवर आता ‘एआय’ ठेवणार नजर

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक...

समुद्रात मोठे वादळ, प्रतिकूल हवामानामुळे पुरेशी मासळी मिळेना

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने...
HomeRatnagiriरत्नागिरी नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वेचा आठवडा बाजाराला शिस्त लावण्याचा चंग !

रत्नागिरी नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वेचा आठवडा बाजाराला शिस्त लावण्याचा चंग !

बेशिस्त वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा देण्यात आला.

नुतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्व यांनी शहरातील नागरिकांच्या मूलभूत गोष्टींवर अधिक भर दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारचा बाजार आणि शनिवारचा आठवडा बाजारातील व्यवसायिकांना आणि वाहन धारकांना शिस्त लावण्याचा चंग’ बांधला आहे. शहरातील ग्राहकांना सहज खरेदी करता यावी यासाठी बाजारात चुकीच्या पद्धतीने बसणारे व्यापारी, कचरा तिथेच टाकून देणारे, वाहन पार्किंग कुठेही करणे, अशा गोष्टींना शिस्त लावण्यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवकांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर त्याचा आढावा देखील घेतला. आणखी एकवेळा समजावून सांगणार. त्यानंतर बेशिस्त वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा नगराध्यक्ष सौ. सुर्वे यांनी दिला आहे. रत्नागिरी शहरामध्ये शनिवारी आठवडा बाजार भरतो तर नाचणे येथे मंगळवारी बाजार भरतो. नाचणे हे मध्यवर्ती ठिकाणी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात तिथे खरेदीसाठी गर्दी होते. तिथे जागा देखील प्रशस्त आहे. परंतु व्यापाऱ्यांना आणि वाहनधारकांना शिस्त नसल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या सुषंगाने नगराध्यक्षा शिल्पा, सुर्वे आणि स्थानिक नगरसेवक सौ. मेधा कुळकर्णी, राजू कीर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन मंगळवारी प्रत्यक्ष आठवडा बाजारात पाहणी केली.

तिथे त्यांना चुकीच्या पद्धतीने कुठेही आपला व्यवसाय मांडलेले व्यापारी, छोटे, मोठे विक्रेते आणि बेशिस्त वाहन पार्किंग दिसून आले. याबाबत नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांना सूचना देऊन काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचे पालन झाले की नाही, हे देखील त्यांनी पुन्हा जाऊन पाहिले. तर २५ टक्के सुधारणा झाली होती. आणखी एकदा व्यापाऱ्यांना आणि वाहनधारकाना याबाबत सूचना केली जाणार आहे. त्यानंतर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरात भरणाऱ्या आठवडा बाजाराबाबत देखील त्यांनी तिच भूमिका घेतली आहे. येत्या आठवडा बाजारात त्या पाहणी करून तिथेही बेशिस्त बसणाऱ्या व्यावसायिक आणि वाहन धारकांनी समज दिली जाणार आहे. कारण आठवडा बाजारात मुख्य रस्त्यावर वाहने पार्किंग करून ठेवली जातात. काही व्यावसायिक रस्त्याला लागू बसतात. त्यामुळे मोठी वाहने आली की वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न देखील सोडविला जाणार आहे. एकदा किंवा दोन वेळा समज दिली जाणार नाही. त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे नगराध्यक्ष सौ. सुर्वे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular