27.5 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeKhedऑईलचा टँकर उलटला भोस्ते घाटात अपघात...

ऑईलचा टँकर उलटला भोस्ते घाटात अपघात…

भोस्ते घाटातील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरू आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणारा टँकर संरक्षक भिंतीला धडकून उलटला. या अपघातानंतर या टँकरमधील ऑईलसदृश रसायनास गळती लागली आणि महामार्गावर ऑईलयुक्त रसायन पसरले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी भोस्ते घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवली आहे. अपघात सायंकाळी घडला. टँकर उलटल्यानंतर ऑईल रस्त्यावर पसरले होते. संपूर्ण रस्ता निसरडा झाला होता. अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिस आणि खेड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाला आहे. भोस्ते घाटातील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरू आहे.

सुदैवाने अपघात घडला तेव्हा या रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. यामध्ये टँकरचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अद्यापही कोणतीही नोंद नसल्याने अपघाताची अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, भोस्ते घाटातील याच अवघड वळणावर आतापर्यंत शंभरहून अधिक भीषण अपघात झाले आहेत. भोस्ते घाटातील या अवघड वळणावर हे प्रवण क्षेत्र असून या ठिकाणाला प्रशासनाकडून ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular