26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriगणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबरपासून धावणार १५ जादा एसटी बसेस

गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबरपासून धावणार १५ जादा एसटी बसेस

म ोजक्या गाड्या जाहीर करण्यात आल्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे.

गणेशोत्सवात धावणाऱ्या जादा गणपती स्पेशल एसटी बसफेऱ्या आरक्षण एसटी प्रशासनाने ४ जुलैपासून खुले केल्यानंतर गणेशभक्तांच्या नजरा जादा बसफेऱ्याकडे लागल्या होत्या. त्यानुसार कोकण म ार्गावर ४ सप्टेंबरपासून १५ जादा बसेस धावणार असल्याचे एसटी महामंडळाने शनिवारी सायंकाळी जाहीर केले. यंदा गणेशोत्सवाची ७ सप्टेंबरपासून धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या नजरा जादा एसटी बसफेऱ्याकडे खिळल्या होत्या. अखेर एसटी प्रशासनाने १५ जादा बसफेऱ्या जाहीर केल्याने आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची त्या त्या बसस्थानकातील तिकीट खिडक्यांवर एकच झुंबड उडत आहे.

म ोजक्या गाड्या जाहीर करण्यात आल्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे. ४ सप्टेंबरपासून कोकणात सायंकाळी ६ वाजता कल्याण- कणकवली, ६.३० वाजता कल्याण- राजापूर, रात्री १० वाजता कल्याण चिपळूण, ९ वाजता कल्याण-गुहागर, कल्याण-दापोली, सायंकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी-राजापूर, रात्री ८.४५ वाजता विठ्ठलवाडी-रत्नागिरी, सायंकाळी ७.१५ वाजता विठ्ठलवाडी- जैतापूर, रात्री ८.३० वाजता विठ्ठलवाडी- साखरपा, ८.१५ वाजता विठ्ठलवाडी-देवरूख, सायंकाळी ७  वाजता विठ्ठलवाडी-गुहागर, रात्री ८.४५ वाजता विठ्ठलवाडी-चिपळूण, ८.१५ वाजता विठ्ठलवाडी-दापोली, रात्री ९.४५ वाजता विठ्ठलवाडी-खेड सकाळी ११.३० वाजता विठ्ठलवाडी- शिवतरघळ आदी जादा बसफेऱ्या जाहीर केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular