25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeKhedकोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

विजेच्या मागणीच्या आधारावर सुमारे १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले.

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यातून ९३३ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती झाली. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी दुष्काळाचे सावट होते. परिणामी, विजेची मागणी पावसाळ्यात देखील अधिक असल्याने जून ते ऑक्टोबर वीजनिर्मिती अधिक करावी लागली होती. यंदा मागणी कमी असल्याने विनावापर धरणातून सोडलेल्या पाण्याचा टक्का अधिक आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यात धरणातून पुरेशी वीजनिर्मिती होईल. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरण क्षेत्रात ५७८७ मिलिमीटर, नवजा ६८६२ मिलिमीटर, महाबळेश्वर ६६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातील साठा अत्यंत कमी होता. १७.८७ टीएमसी साठा असताना पावसाला सुरुवात झाली. धरण शंभर टक्के भरले. धरणातील एकूण पाण्याची आवक १७७.८४ टीएमसी झाली. पैकी सुमारे ५९ टीएमसी इतके पाणी दरवाजातून सोडले. हे संपूर्ण पाणी विनावापर सोडले.

त्याचवेळी विजेच्या मागणीच्या आधारावर सुमारे १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यात पोफळीतून ३४५.९१०, स्टेज चारमधून ३४४.५००, केडीपीएचमधून ४८.८३०, अलोरे दरवाजातून १९३.९९२ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती केली. परिणामी, यंदा पावसाळ्यात मागणीपेक्षा अधिक वीजनिर्मिती शक्य झाली. गतवर्षी राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती होती. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही दुष्काळ जाहीर केला होता. टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सलग चालवण्याची वेळ, आली होती. कोयनेतून त्यासाठी अतिरिक्त वीजनिर्मिती करावी लागली. गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातील साठा १७.६४ टीएमसी होता. धरणातील एकूण साठा ९१ टीएमसीपर्यंत राहिला. एकूण पाण्याची आवक यंदाच्या तुलनेत तब्बल ७० टीएमसी कमी होती म्हणजेच केवळ १०७ टीएमसी पाणी धरणात आले होते. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडला; मात्र काही दुष्काळी पाऊस सुरू व्हायला उशीर लागला. म्हैसाळ उपसा सिंचनसारखी योजना जतसाठी चालवावी लागली. त्यामुळे धरणातून सुमारे १.१६ टीएमसी पाणीसाठा या योजना चालवण्यासाठी वापरण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular