सुशांत राजपूतच्या मृत्यू नंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आले. या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची ड्रग्ड कनेक्शन संदर्भात एनसीबीकडून गंभीर करत सखोल चौकशी करण्यात आली. सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर जे कॉल आले होते, त्या कॉलच्या संदर्भातला उल्लेख बिहार पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये निदर्शनास आले आहेत. अभिनेता सुशांत राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आले आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केला. सुशांत राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला A U नावाने ४४ फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव असल्याची बिहार पोलिसांनी माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी थेट संसदेत केला. राहुल शेवाळे यांच्या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.
Love You More… म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरकटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. याचं लग्न आमच्या घराण्यांनी कसं वाचवलंय आम्हाला माहित आहे. मला वैयक्तीक पातळीवर बोलायचे नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राहुल शेवाळ यांना एक प्रकाराचा इशाराच दिला आहे.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मला त्या घाणीत जायचं नाही. पहिली मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. आम्हाला सभागृहात बोलू दिल जात नाही. राज्यपालांना का वाचवलं जातय? राज्यपाल महापुरुषांचा अपमान करतयं मुख्यमंत्री, सरकारला राग येत नाही खोके सरकार राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न करतयं. सरकार महाराष्ट्र द्वेषी आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.