24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeEntertainmentनॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर अल्लू अर्जुन करणार आहे नवा धमाका - ...

नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर अल्लू अर्जुन करणार आहे नवा धमाका – ‘पुष्पा 2’

पुष्पा 2' चित्रपटाच्या पहिल्या भागाची क्रेझ अजूनही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. तेव्हापासून अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2’ शी संबंधित नवीन अपडेट्स समोर येत आहेत. रजनीकांतच्या ‘जेलर’नंतर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या पहिल्या भागाची क्रेझ अजूनही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘पुष्पा 2’ च्या रिलीज डेटबाबत एक अपडेट समोर आले आहे.

पुष्पा २ रॉक करायला तयार आहे – 2023 मध्ये ज्या चित्रपटांची प्रेक्षक सर्वाधिक वाट पाहत आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’. ‘पुष्पा’ फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचबरोबर देवी श्री प्रसाद यांच्या रचनेत बनलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. 2021-2022 या वर्षात ‘पुष्पा’ मधील ‘समी सामी’ आणि ‘ऊ अंतवा’ ही गाणी सर्वाधिक ऐकली गेली. आता या चित्रपटाचा सिक्वेलही बॉक्स ऑफिसवर धमाल करायला सज्ज झाला आहे.

या दिवशी पुष्पा 2 प्रदर्शित होणार आहे – दक्षिणेच्या व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ‘पुष्पा 2’ ची रिलीज डेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘पुष्पा द रुल’ 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘पुष्पा: द राइज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुष्पा 2 बद्दल – ‘पुष्पा 2’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर फहद फाजील चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पुष्पा 2’ चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular