25 C
Ratnagiri
Sunday, December 8, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRajapurराजापूर आगारासमोरील रस्त्याचे काम अर्धवट

राजापूर आगारासमोरील रस्त्याचे काम अर्धवट

रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वाड्यांमधील लोकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र शहरातील एसटी डेपोसमोरील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. बंगलवाडी, गुरववाडीकडे जाणारा सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन, पथदीप व्यवस्थेचे काम रखडले आहे. रखडलेली ही कामे मार्गी लागण्यासाठी लोकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे; मात्र ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रशासनाकडून डोळेझाक केले जात असल्याने लोकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शहरातील गुरववाडीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

याचे निवेदन माजी नगरसेवक विनय गुरव आणि गुरववाडी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांना दिले. प्रजासत्ताक दिनी (ता. २६) उपोषण प्रांताधिकारी कार्यालय येथे छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अर्धवट स्थितीतील या रस्त्याचा फटका या भागातील बँका, व्यापारी, दुकानदारांना बसत असून आर्थिक नुकसान होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वाड्यांमधील लोकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या कामावर योग्य तोडगा काढून येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची सातत्याने लोकांकडून मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular