21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeChiplunचिपळूणमधील इमारतीवर पालिकेची कारवाईसाठी धडक

चिपळूणमधील इमारतीवर पालिकेची कारवाईसाठी धडक

इमारत धोकादायक बनल्याने येथे राहणाऱ्या २० कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 

शहरातील खंड-गुहागर बायपास रस्त्यालगतच्या दोस्ती गॅलेक्सी इमारतीमधील चार सदनिकाधारकांनी गॅलरीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे इमारतीच्या पिलर्सना तडे जाऊन धोका निर्माण झाल्याची तक्रार इमारतीतीलच सदनिकाधारकांनी केली होती. त्याची दखल घेऊन शुक्रवारी (ता. १९) मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि अतिक्रमण हटाव पथक या इमारतीचे वाढीव बांधकाम हटवण्यासाठी गेले; मात्र संबंधित सदनिकाधारकांनी २५ जानेवारीपूर्वी स्वतःहून बांधकाम हटवणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने कारवाई मागे घेण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी दोस्ती गॅलेक्सीमधील सदनिकाधारकांनी वाढीव बांधकामाबाबत चिपळूण पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती.

कारवाई होत नसल्याने ३ जानेवारीला स्मरणपत्रही दिले होते. या संदर्भात प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशाराही पालिकेला दिला होता. दोस्ती गॅलेक्सी ही इमारत १४ वर्षांपूवीं बांधण्यात आली आहे. पालिकेने या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. मात्र पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याव्यतिरिक्त चार सदनिकाधारकांनी गॅलरीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केले. दोन ते पाच टन वजनाच्या गॅलरी बाहेर काढल्याने इमारतीवर लोड येऊन धोका निर्माण झाला आहे. यामुळे इमारतीच्या अनेक पिलर्सना तडे गेले आहेत. हे पिलर पुन्हा मजबूत करण्याची वेळ आली आहे. इमारत धोकादायक बनल्याने येथे राहणाऱ्या २० कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

पाच वर्षे पालिकेकडे याबाबत पाठपुरावा अन् पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केल्यामुळे नाइलाजास्ताव प्रजासत्ताक दिनी पालिकेसमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा इतर सदनिकाधारकांनी दिला होता. या तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी (ता. १९) सकाळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह अतिक्रमण हटाव पथकाने दोस्ती गॅलेक्सी इमारतीवर धडक देत मोजमापही केले. यावेळी चार सदनिकाधारकांनी गॅलरीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. ते हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या तेव्हा काही वेळातच वाढीव बांधकाम करणाऱ्या चार सदनिकाधारकांनी पालिकेत धाव घेतली व पत्र देत २५ जानेवारीपर्यंत वाढीव बांधकाम काढून घेण्याची ग्वाही दिली. अन्यथा पुढील सोमवारी (ता. २९) पालिकेमार्फत कारवाई केली जाईल, अशी तंबीवजा सूचना प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular