24.4 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeRatnagiriएसटी भाडेवाढविरोधातील निषेध आंदोलन मागे - दीपक चव्हाण

एसटी भाडेवाढविरोधातील निषेध आंदोलन मागे – दीपक चव्हाण

यावर्षी २० दिवसांकरिता हंगामी प्रवासी भाडेवाढ करून प्रवाशांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

ऐन दिवाळीत आणि पंढरपूरच्या वारीदरम्यान एसटी महामंडळाने केलेल्या प्रवासी भाडेवाढीविरोधात गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने (मुंबई) निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु मुंबई आगारात लागलेली आग, मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेली आंदोलने, दिवाळी सण आणि कार्तिकी वारीनिमित्त पंढरीरायाचे दर्शन या सर्वांचा ‘विचार करून आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. हंगामी प्रवासी भाडेवाढ केली नसती तरीही एसटीचा महसूल वाढला असता, असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी सणात हंगामीप्रवासी भाडे करण्याचा पायंडा पडला आहे; पण ही दिवाळी सणादरम्यान १० दिवसांसाठी असायची.

त्यामुळे पंढरपूरच्या कार्तिकवारीस जाणाऱ्या वारकरी प्रवाशांना याची झळ पोहचत नव्हती; पण यावर्षी २० दिवसांकरिता हंगामी प्रवासी भाडेवाढ करून प्रवाशांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांनी केला. आता दिवाळी हंगाम संपला आहे. त्यामुळे आजपासून वारकर कार्तिकीवारीला पंढरपूरला जायला सुरवात होणार आहे. त्यामुळे आजपासुन १० टक्के हंगामी केलेली प्रवासी भाढेवा रद्द करा अशी मागणी कार्याध्यक्ष दीपक चव्हाण आणि गंगाराम खांडेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular