29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeEntertainmentक्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच विवाहबंधनात अडकणार

क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच विवाहबंधनात अडकणार

आता ही लग्नसराई क्रीडाविश्वातही सुरु व्हायला लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरू आहे. बॉलीवूड आणि क्रिकेटच खूप जवळच कनेक्शन आहे. अनेक क्रिकेटरच्या पत्नी या सुप्रसिद्ध सिने कलाकार आहेत. आता ही लग्नसराई क्रीडाविश्वातही सुरु व्हायला लागली आहे. लवकरच भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांनाही याची उत्सुकता लागली आहे.

सोशल मीडियावर अनेकदा या दोघांचेही एकत्र फोटो व्हायरल झाले आहेत. अखेर हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे दिसत आहे. याच वर्षाच्या अखेरीस दोघांचा विवाह होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल नेहमी त्याच्या स्टाईल, आणि विशिष्ट खेळाच्या शैलीमुळे तसेच विविध  कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. या संघात तो धडाकेबाज खेळी करतोय. नुकताच केएल राहुलचा वाढदिवस झाला. यावेळी अभिनेत्री अथियाने तिच्या सोशल मीडीयावर राहूल सोबतचे फोटो शेअर करत ‘anywhere with you, happy birthday’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यानी लग्नापूर्वीची ही झलक दाखवली आहे.

क्रिकेटर के. एल. राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी हे गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी अनेकदा आपल्या नात्याची कबुलीही दिली आहे. सुनील शेट्टी हा मंगळुरचाच आहे. तसेच के. एल. राहुलचंही मंगळूरशी खास नातं आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य रितीरिवाजाप्रमाणे होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लग्नाच्या बातमीबद्दल पुढे कळणाऱ्या माहितीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular