28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeEntertainment..... आणि अचानक आला “यांचा” फोन, सर्वच अवाक

….. आणि अचानक आला “यांचा” फोन, सर्वच अवाक

व्हिडीओ कॉलवर मुख्यमंत्री म्हणाले, 'मला लग्नाला यायला जमलं नाही म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी आपल्या अनेक वर्षाच्या नात्याला अखेर लग्नबंधनात बांधलं अन् त्यांच्या अनेक चाहत्यांना सुखानुभव दिला. २ डिसेंबर,२०२२ रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी पुण्यात आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. दोघांनीही अगदी रितसर विधी-परंपरांचा सोहळा साजरा करत दणक्यात लग्न केलं.

अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यानंतर खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईंकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. राजकीय मंडळीदेखील त्यांच्या रिसेप्शनला उपस्थित होते. याच सोहळ्यात अचानक एक फोन खणखणला आणि सर्वांचच लक्ष वेधलं गेलं. तो फोन होतो खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा.

हार्दिक अक्षयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लग्नाचे आमंत्रण दिलं होतं. पण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी हार्दिक -अक्षयाला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून व्हिडीओ कॉल केला. आणि या कॉलच्या माध्यमातून त्यांनी दोघांनाही शुभाशीर्वाद दिले. हा मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओ कॉलवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला लग्नाला यायला जमलं नाही म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर हार्दिक म्हणाला,” धन्यवाद सर.. ठाण्यात आलो की भेटायला येतो.. घरी येऊन जातो.. ” हा कॉल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण या लग्नाचं रिसेप्शन सुरू असताना अचानक आलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या फोनने मंचावरील संपूर्ण चित्रच पालटून गेलं. नव दांपत्याने त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून, प्रत्यक्ष भेट घेण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular