सावंतवाडी तालुक्यात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडून आलेल्या विदेशी महिलेची ओळख पटली असून ती अमेरिकन असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यातील बांबोली रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची तब्बेत सुधारत आहे. दरम्यान अमेरिकन दुतावासाने या प्रकरणात लक्ष घातल्याने सिंधुदुर्ग पोलिसांवरती दबाव वाढला आहे. पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत. या महिलेची मानसिक स्थितीमध्ये हळू हळू सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.
ह्या प्रकरणात अमेरिकीन दुस्तावास यांनी दखल घेतल्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक ह्यांनी जातिनिशी पुढाकार घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तामिळनाडूला रवाना केले असून पोलीस अधिक्षक हे सर्व गोष्टींचा वेळेवेळी अहवाल घेत आहेत. तर बांदा पोलिसांचे एक पथक काल रात्री तामिळनाडूला निघाले असून आज (मंगळवार) दुपारपर्यंत ते तेथे दाखल होतील यानंतर पुढील तपासाला गती मिळणार आहे. महिला ही विदेशी नागरिक असल्याने सध्या हा विषयावर राष्ट्रिय पातळीवरून पण लक्ष ठेवण्यात येत आहे.
महिलेच्या तब्येतीत सुधारणा – सदर महिलेला दवाखान्यात आणल्यानंतर तिच्यावर उपचार करताना तिचा तोंडाचा जबडा हा बंद होत नव्हता. त्यामूळे अनुभवी डॉक्टरांची सोय गोवा येथे असल्याने तेथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. त्यासाठी तेथिली वरिष्ठ दंत चिकित्सक यांची टीम तिच्यावर उपचार करत असून, जायबंदी झालेला जबडा पून्हा व्यवस्थित करण्याचे पर्यन्त युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. यावेळी महिलेला खाण्याच्या वस्तू दिल्या असता तिला ते खाता येत नव्हत्या. मात्र आता सौम्य प्रमाणात त्या महिलेने खाण्यास सुरवात केली असून तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
महिलेकडून पतीचे नाव – पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत. ललिता कायी कुम ार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत.