25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeKhed'त्या' भामट्याकडून बँकांच्या सात खात्यांमध्ये रक्कम वर्ग

‘त्या’ भामट्याकडून बँकांच्या सात खात्यांमध्ये रक्कम वर्ग

फसवणूक प्रकरणात मोठे रॅकेट असण्याचाही पोलिसांना संशय आहे.

शहरातील एका तरूणाला २४.८५ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्या प्रकरणी येथील पोलिसांनी सुरत येथून अटक केलेल्या नारायणलाल शंकरलाल जोशी (४२, रा. सुरत गुजरात, मूळगाव उदयपूर-राजस्थान) याने फसवणुकीतील रक्कम बँकांच्या ७ खात्यांमध्ये वर्ग केल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे. त्यानुसार येथील पोलिसांनी त्या त्या बँकांच्या खात्यांचा तपशील म ागवला असून तो एक-दोन दिवसातच प्राप्त होण्याची शक्यता आहे. या फसवणूक प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

ए.आर.के. या व्हॉट्सअँप ग्रुपवरून ट्रेडींग संदर्भातील संदेश पाठवत कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवत येथील एका तरूणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. या प्रकरणी नीरज महेंद्र नांगरा (२२, चंढीगड-हरियाणा) याच्यानंतर नारायणलाल जोशी याच्या सुरत येथे मुसक्या आवळल्या. बंगलोर, दिल्ली, महाराष्ट्रात त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीतील रक्कम विविध बँकांच्या ७ खात्यांमध्ये वर्ग केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. एका व्यक्तीच्या खात्यावरही रक्कम पाठवल्याची कबुली दिल्याचे समजते. त्यानुसार येथील पोलिसांनी तपास गतिमान केला असून सातही बँकांकडे त्याच्या खात्यांचा तपशील मागवला आहे.

हा तपशील प्राप्त झाल्यानंतरच फसवणुकीच्या रकमेचा उलगडा होणार आहे. याशिवाय फसवणूक प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचाही पडताळा करण्यात येत आहे. फसवणूक प्रकरणात मोठे रॅकेट असण्याचाही पोलिसांना संशय आहे. या बाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ‘निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular