28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiri१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

पोलीस कवायत मैदान, रत्नागिरी येथे आज त्यांच्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

रत्नागिरी जिल्हयात पर्यावरण संतुलन व औद्योगिक विकास यातून शाश्वत विकासासाठी शासन कटीबध्द आहे असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

पोलीस कवायत मैदान, रत्नागिरी येथे आज त्यांच्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  जिल्हयाने राज्याच्या आवास योजनेत दुसरा क्रमांक मिळविला आहे याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

पालकमंत्री म्हणाले कोविडचे संकट सध्या जरी राज्यात नसले तरी, त्याबाबत सातत्याने काळजी घेणे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे याला सर्वांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. जिल्हयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम वेगात करण्यात आले. आतापर्यंत २१ लाख ३ हजार २६६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रिकॉशन लसीकरण २४  हजार २९८ इतके आहे. सहव्याधी लोकांनी पात्र झाल्यास तिसरा बुस्टर डोस घेऊन सुरक्षितता वाढविणे गरजेचे आहे. सोबतच नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण जिल्हयात शुन्य कोरोना स्थिती मिळवली असली तरी इतर देशांमधील याची स्थिती बघता आपण गाफील राहून चालणार नाही. नागरिकांना सक्ती नसली तरी सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गेल्या ३ वर्षात निसर्गाने जिल्हयात सातत्याने संकटे आणली. दोन चक्रीवादळे आणि त्यानंतर चिपळूण येथे निर्माण झालेली पूरस्थिती आपण अनुभवली विशेष बाब म्हणून चिपळूण शहरलगताच्या नद्यांमधील गाळ उपसण्यास शासनाने तातडीने मान्यता दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिकरित्या याकडे लक्ष दिले. या ठिकाणी मोठया प्रमाणात गाळ उपसा झाला असून येत्या काळात असे संकट पुन्हा येणार नाही अशी आशा बाळगू या, असे ते म्हणाले.

आपल्या मनोगताशेवटी सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनासोबतच  दोन दिवसांनी येणाऱ्या परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया, रमजान ईद शुभेच्छा देऊन सर्व सण सलोखा ठेवून शांततेत साजरे करा असे आवाहन पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular