28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeChiplunरेल्वेची रिझर्वेशन आणि करंट तिकीट पद्धती सूरु करण्याची मागणी

रेल्वेची रिझर्वेशन आणि करंट तिकीट पद्धती सूरु करण्याची मागणी

रेल्वे प्रशासनाने रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या, नाही तर याद राखा असा इशारा दिला आहे.  

कोरोना काळापासून कोकण रेल्वेचे बदललेले टाईमटेबल आणि नियम आत्ता कोरोनाचा प्रभाव कमी झाला तरी सुद्धा अजून सुरु आहे. अजून सुद्धा तिकिटांचे रिझर्वेशन केल्याशिवाय रेल्वेमध्ये प्रवेश मिळणे शक्य नसल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोकणामध्ये येण्यासाठी आता सुरळीत रेल्वे सेवा सुरु झाल्या असून, जनरल तिकीट विक्री सुरु झालेली नाही.

कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी हि तिकीट विक्री सेवा पूर्वीप्रमाणे जशी चालू होती, त्याच पद्धतीने सुरु करण्यात यावी. रेल्वे प्रशासनाने रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या, नाही तर याद राखा असा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे मध्ये फक्त दादर पॅसेंजर व दिवा पॅसेंजर या दोन गाड्याना जनरल तिकीट मिळते बाकी सर्व गाड्यांना आरक्षण तिकीट शिवाय दुसरा काही पर्यायच मिळत नाही,  त्यामुळे अचानक निघणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात आणि नाईलाजास्तव विना तिकीट गाडीमध्ये प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाईला प्रवाशांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जसे पूर्वीच्या पद्धतीने गाड्या रिझर्वेशन आणि करंट तिकीट चालू होते,  हीच पद्धत पुन्हा सुरु करण्यात यावी. अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

येत्या चार दिवसांमध्ये आपण स्वतः रत्नागिरी, चिपळूण, खेड या रेल्वे स्टेशनला भेट देऊन प्रवाशांना सहन करावा लागणारा त्रास, समस्या त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत,  असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कोकण रेल्वे प्रवाशांचा छळ करू नका, नाही तर याद राखा असा सज्जड इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular