तालुक्यातील वाटूळ येथील १०० खाटांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजूरी मिळाली आहे. आता सुमारे ५ एकर जागेध्ये भव्य इम ारतीसाठी १०० कोटीचा नवा प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात याची तरतुद केली जाणार आहे. यामुळे राजापूर, लांजा तालुक्यासह सिंधुदुर्गातील आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांना ते सोयिचे होणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी याला दुजोरा दिला. शासनाच्या आरोग्य संचालकांना त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वाटुळ येथील या १०० खाटांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा हा प्रस्ताव त्यांनी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत त्यासाठी आग्रही होते. त्यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन याला मंजुरी देण्यात आली आहे.
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लागणाऱ्या आकृतीबंधानुसार उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या, अतिरिक्त निर्माण करावी लागणाऱ्या ११६ पदांची निर्मिती केली जाणार आहे. निर्माण होणाऱ्या पदावर येणारा मासिक व वार्षिक खर्च ४ कोटी २५ लाख १७ हजार २०० अपेक्षित आहे. या हॉस्पिटलसाठी प्रस्तावित होणारी लोकसंख्या लांजा तालुक्याची १ लाख ३६ हजार ९४२, संगमेश्वर तालुक्याची १ लाख ९८ हजार ३४३ एवढी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लागुन हे रुग्णालय होणार आहे. वाटुळ येथे ६७ कोटीच्या हा प्रकाल ५ एकर जागेत होणारं आहे. पाच एकर जागेमध्ये हे हॉस्पिटल होणार असल्याने त्याच्या इमारतीचा सुमारे १०० कोटीचा स्वतंत्र प्रस्तावा आरोग्य विभागाला सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात त्याचा तरतुद व्हावी, यासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची भव्य इमारत वाटुळ येथे होणार आहे. या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधामुळे आधुनिक उपचार रुग्णांना मिळणार आहे.