21.8 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

रत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीत काळा बाजार

रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री ठिकाणी काळ्या...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर...

‘नो रोड, नो वोट !’ संगमेश्वरातील संभाजीनगरचा संतापाचा उद्रेक

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगर येथील ग्रामस्थांचा संयम अखेर...
HomeMaharashtraएकमेकांवर तुटून पडणारे नक्की हेच नेते होते का? राणा दाम्पत्य आणि ...

एकमेकांवर तुटून पडणारे नक्की हेच नेते होते का? राणा दाम्पत्य आणि राऊतांचे लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल

आम्हाला जेलमध्ये टाकण्याएवढा आम्ही कोणता गुन्हा केला होता?  हा प्रश्न राऊतांना विचारल्यावर ते निशब्द झाले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचे शिवसेना खासदार संजय राऊत यांबरोबरचे लेह लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर तिन्ही नेत्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वी अख्खी मुंबई हलवून टाकणारे, एकमेकांना हिणवणारे, एकमेकांवर तुटून पडणारे नेते आज एकाच टेबलावर बसून गप्पा मारत जेवण करत असल्याचं अनेकांना पटलं नाही.

शिवसेनेला शिंगावर घेणाऱ्या राणा दाम्पत्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेहमधील फोटो व्हायरल झाले. एकमेकांवर तुटून पडणारे नक्की हेच नेते होते का?  असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला. एकाच टेबलावर बसून जेवणं, गप्पांची मैफिल, फोटोसेशन, एकत्रित आनंदाने फिरणं  असे राऊत-राणा दाम्पत्याचे अनेक फोटो सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या फोटोनंतर मीडियाने राऊत राणा दाम्पत्याला गाठून या सर्व प्रकरणाबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तेव्हा राजकीय संस्कृतीचे दाखले देत दोन्हीही नेत्यांनी त्यापुरती वेळ मारुन नेली.

नवनीत राणा यांनी या सर्व प्रकरणावर सांगितले कि, “मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले होते. संजय राऊत त्या दौऱ्यावर आहेत, असं म्हणून तो दौरा रद्द करण्याचा बालिशपणा मी केला नाही. कारण मी समजूतदार आहे. शेवटी एका दौऱ्यात आल्यानंतर एखाद्या विषयावर चर्चा, एखाद-दुसऱ्या विषयावर मतमतांतरे होणं स्वाभाविक आहे. पण आमच्यावर झालेला अन्यायाची गोष्ट माझ्या मनात तशीच होती आणि ती कायम राहिली. एकत्र जेवण जरी केलं असलं, गप्पा जरी मारल्या असल्या तरी आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला.

आम्हाला जेलमध्ये टाकण्याएवढा आम्ही कोणता गुन्हा केला होता?  हा प्रश्न राऊतांना विचारल्यावर ते निशब्द झाले. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हे सगळं वरच्या लेव्हलला झालं असं म्हणत त्यांनी वेळ मारुन नेली”.  परंतु, शिवसेनेविरोधात आमची विचारांची लढाई आहे, आणि ती कायमच असेल. आम्ही त्यांचा प्रतिकार विचारांनीच करु. भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा कायम असेल. विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक नेत्यांविरोधात आमची लढाई कायम असेल, असं सांगत शिवसेनेबरोबर येणाऱ्या काळातही संघर्ष कायम राहणार असल्याचे संकेत नवनीत राणा यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular