25.9 C
Ratnagiri
Monday, August 8, 2022

तुफानी पावसामध्ये देखील मिशन हर घर तिरंगा जनजागृती सायकल रॅली यशस्वी

रत्नागिरीत मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी...

जिल्ह्यात पुढील ४८ तास रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे....
HomeSportsबॉक्सिंगमध्ये इतिहास रचलेली, भारतीय बॉक्सर निकहत जरीन सलमानची जबरदस्त फॅन

बॉक्सिंगमध्ये इतिहास रचलेली, भारतीय बॉक्सर निकहत जरीन सलमानची जबरदस्त फॅन

पोस्टमध्ये निकहतनं लिहिलं होतं, 'मी स्वत:ला सलमान खानची मोठी फॅन समजते, आणि माझ्यासाठी हि खूपच मोठी गोष्ट आहे.

भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीननं इतिहास रचला आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारताला महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४ वर्षानंतर गोल्ड मिळाले. यापूर्वी २०१८ साली भारतीय एमसी मेरीकोमने सुवर्ण जिंकून दिले होते. भारताने या स्पर्धेच्या इतिहासात १० वे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यातील ६ सुवर्णपदक एकट्या मेरीकोमने जिंकली आहेत. याशिवाय जेनी आरएल, सरिता देवी  आणि लेखा सी यांनी देखील सुवर्णपदक जिंकले आहे.

निकहत बजरंगी भाईजान सलमान खानची जबरदस्त फॅन आहे. एकदा एका मुलाखतीत तिनं सलमान खानला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. मुलाखतीत ती सलमानची किती चाहती आहे,  हेही तिने सांगितलं होत. तो व्हिडिओ व्हायरल होऊन सलमानपर्यंत पोहोचला होता. आता भारतासाठी एवढी मोठी कामगिरी करणाऱ्या निकहतचं सलमाननं अभिनंदन केलं आहे.

दिलेल्या मुलाखतीमध्ये निकहत जरीननं सलमान खानला आपला जान म्हटलं होतं. ती म्हणाली, ‘मी सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. माझं स्वप्न आहे की मी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावं आणि मुंबईला पोहोचल्यावर प्रथम सलमानला भेटावं. गुरुवारी ५२ किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये निकहतने थायलंडच्या जिटपॉन्ग जुटामस ला ५-० ने पराभूत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निकहतचं विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे.

याच व्हिडिओला पोस्ट करत सलमान खाननं निकहत जरीनला शुभेच्छा दिल्या. अभिनेता म्हणाला, ‘या सुवर्ण पदकासाठी निकहत तुझं मन:पूर्वक अभिनंदन’.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्सनी निकहत जरीनच्या जुन्या ट्विट्सला देखील शेअर केलं आहे. ज्यामध्ये निकहतनं सलमान खानला त्याच्या वाढदिवसा दिवशी ही शुभेच्छांची पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये निकहतनं लिहिलं होतं, ‘मी स्वत:ला सलमान खानची मोठी फॅन समजते, आणि माझ्यासाठी हि खूपच मोठी गोष्ट आहे. सलमान तू सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करतोस. काळजी घेतोस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular