29.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeSportsअर्जुन तेंडुलकरचे, वडील सचिनसारखेच कर्तुत्व

अर्जुन तेंडुलकरचे, वडील सचिनसारखेच कर्तुत्व

अर्जुनने राजस्थानविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १२० धावा केल्या. १६ चौकार आणि २ षटकार मारले.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने बुधवारी पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतक झळकावले. त्याचा सहकारी फलंदाज सुयश प्रभू देसाईनेही शतक झळकावले, पण अर्जुनचे शतक खास ठरले. वडील सचिननेही ३४ वर्षांपूर्वी १९८८ मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने शतकही केले होते आणि महिनाही डिसेंबरचा होता. मुलाने वडिलांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.

अर्जुनने राजस्थानविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १२० धावा केल्या. १६ चौकार आणि २ षटकार मारले. दोन वेळच्या रणजी चॅम्पियन राजस्थानविरुद्ध त्याने हा पराक्रम दाखवला. त्या संघात कमलेश नागरकोटी आणि महिपाल लोमररसारखे स्टार गोलंदाज आहेत. नागरकोटीनेही अर्जुनची विकेट घेतली. अर्जुनने सुयश प्रभूसोबत सहाव्या विकेटसाठी २२१ धावांची भागीदारी केली.

सचिनने मुंबईसाठी ११ डिसेंबर १९८८ रोजी गुजरातविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला. तेव्हा तो १५ वर्षांचा होता. त्याने १०० धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून शतक झळकावणारा सचिन हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. सचिनने नंतर दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.

अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीही करतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ टी-२० सामन्यांमध्ये १२ विकेट घेतल्या आहेत. १० धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची लिस्ट ए मधील सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत २ बाद आहे. अर्जुन तेंडुलकरने हा पराक्रम कोणत्याही लहान संघाविरुद्ध केलेला नाही. तर राजस्थान संघ दोन वेळा रणजी चॅम्पियन आहे. त्याचबरोबर कमलेश नागरकोटी महिपाल लोमरोरसारखे आयपीएलचे स्टार गोलंदाज संघात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular