कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या मार्गावरील रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. रत्नागिरी ते मडगाव जंक्शनदरम्यान कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी ते मडगाव एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या ३१ मार्च २०२३ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या फेऱ्या आधी ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. पण दुरुस्तीचं काम लांबणार असल्याने ३१ मार्चपर्यंत फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
रत्नागिरी ते मडगाव या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या १०१०१ रत्नागिरी-मडगाव आणि १०१०२ मडगाव-रत्नागिरी या दोन गाड्या तात्पुरत्या रद्द केल्याचे अनेकांची गैरसोय होत आहे. रात्री येणारी रत्नागिरी – दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत धावत आहे. त्यामुळे यातून अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक प्रवास करत करत असत. अशात त्यांना पुढे जाण्यास अडचणी येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.
रत्नागिरी-मडगाव जंक्शन-रत्नागिरी डेली एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. यात आता कालावधीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक १०१०१ आणि १०१०२ रत्नागिरी – मडगाव जं. – रत्नागिरी डेली एक्स्प्रेस ३१ अर्थात शुक्रवारपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी आणि मडगाव विभागादरम्यान सुरू असलेल्या सुरक्षा देखभाल कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आली होती. याआधी या गाड्या दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी ही गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.