21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKhedखेडमध्ये सुंदर खाडी आणि फिरायला होडी ही संकल्पना राबवणार

खेडमध्ये सुंदर खाडी आणि फिरायला होडी ही संकल्पना राबवणार

कांदळवनामध्ये मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता आढळते. दुर्मिळ पक्षी, वनस्पती, वेली, फुलझाडे, प्राणी तर अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आढळतो.

आता दाभोळ वाशिष्ठी खाडीमध्ये पर्यटनाला वाव मिळत असून तिथे बोट सफर करता येणे शक्य होणार  असून. खेडमधील सोनगाव-कोतवली गावच्या परिसरात असणाऱ्या कांदळवनात कांदळवन पाहणी आणि महाकाय मगरीचे दर्शन करण्यासाठी वनविभागाच्यावतीने खास बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. सोनगाव, कोतवली, आयनी या खाडीकिनारी गावांच्या लहान लहान बंदरांवर स्थानिक मच्छीमारांच्या बोटी देखील पर्यटकांना खुणावत आहेत. ‘सुंदर खाडी आणि फिरायला होडी’ ही संकल्पना या ठिकाणी राबवली जात आहे. सोनगाव, कोतवली, आयनी परिसर शासनाने कांदळवन आरक्षित करून तो पर्यटकांसाठीदेखील खुला केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूणदरम्यान असणाऱ्या आणि जगबुडी आणि वाशिष्ठी नदीच्या संगम असलेल्या दाभोळ खाडीत खेडमधील सोनगाव आणि कोतवली गावच्या परिसरात वनविभागाने कांदळवन संवर्धन अभियान आणि पर्यटकांना मगर दर्शन करण्यासाठी खास बोट उपलब्ध करून दिली आहे. कोकणात आता कांदळवन आणि मगर दर्शनासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे.

कांदळवन भरती-ओहोटी दरम्यानच्या कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात. समुद्राच्या लाटांमुळे जमिनीची धूप ते थांबवतात. कांदळवनामध्ये मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता आढळते. दुर्मिळ पक्षी, वनस्पती, वेली, फुलझाडे, प्राणी तर अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आढळतो. प्राणी-पक्ष्यांबरोबरच महाकाय मगरीचे देखील वास्तव्य असते.

पावसाळ्यातही या ठिकाणी नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी गर्दी लोटते. शासनस्तरावर व्यवसायभिमुख उपक्रम राबवल्यास स्थानिक ग्रामस्थांना चांगला रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी मागणी केली जात आहे.  सोनगाव, कोतवली गावाला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्यामुळे कांदळवन मोठ्या प्रमाणात आहे. मगरींची संख्यादेखील खूप आहे; परंतु लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे या कांदळवन आणि मगरींना मोठा फटका बसतो आहे. तरी प्रदुषित सांडपाणी प्रक्रिया करूनच या खाडीत सोडणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular