26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunचिपळूणमध्ये परप्रांतीय तरुणाला पिस्तुल आणि ४६ राउंडसह अटक

चिपळूणमध्ये परप्रांतीय तरुणाला पिस्तुल आणि ४६ राउंडसह अटक

सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पुढील नियोजन करून कार्यवाहिला सुरुवात केली होती.

येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला मुद्देमालसह अटक करून गुन्हा दाखल केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. चिपळूण मधील वालोपे परिसरात एका तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.

मिळालेली माहिती सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पुढील नियोजन करून कार्यवाहिला सुरुवात केली होती. संबधिताला किंवा त्याच्या बरोबर रूममध्ये राहणाऱ्याला कोणताही सुगावा लागू नये याची पूर्ण काळजी घेत पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले. बुधवारी दुपारी १२ वाजता रवींद्र शिंदे यांच्या बरोबर एपीआय साळोखे, संजय पाटील, पीएसआय अरुण जाधव, पंकज खोपडे, पूजा चव्हाण, हेड कॉस्टबेल, पाटील, शेटकर, दराडे, थेट वालोपे येथे पोहोचलें. येथील एका रूममध्ये नीरज हा दरवाजाला आतून कडी लावून असल्याचे पोलिसांना समजताच रुमच्या बाहेर पूर्ण सापळा लावून तसेच सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

दरवाजा उघडताच पोलिसांनी नीरजवर झडप घातली आणि रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड आढळून आले. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाले ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती.? आणि कशासाठी बाळगली होती.?याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular