25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeKhedतब्बल २४ तासानंतर दरड हटविण्यात अणुस्कुरा यश

तब्बल २४ तासानंतर दरड हटविण्यात अणुस्कुरा यश

अवाढव्य दगड ब्लास्टिंगद्वारे न फोडून काही दगड बाजुला करण्यात आले.

तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटविण्यात बांधकाम विभाग आणि संबंधितांना यश आले असून शुक्रवारी सायंकाळी ७.३० वा. नंतर या घाटातून वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. दरम्यान तत्पूर्वी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अणुस्कूरा घाटात सायंकाळी ७.३० वाजता भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली. कोसळलेली दरड हटविण्याचे काम राजापूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून युध्दपातळीवर सुरू करण्यात आले.

शुक्रवारी सायंकाळी या मार्गावरील एका बाजुची दगड व माती काढून दुचाकी व छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम. उपविभागाकडून देण्यात आली. तब्बल २१ तासांनी छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र तरीही काम सुरुच होते. अखेर २४ तासांनंतर दरड पूर्णतः हटविण्यात यश आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

वाहतूक ठप्प – कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा घाट म्हणून अणुस्कूरा घाटाची ओळख आहे. यंदा पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या सुरूवातीलाच घाटात दरड कोळल्याने यापुढे अतीवृष्टी काळात या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरणार असून यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन व उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरड कोसळली – गुरूवारी सायंकाळी राजापूर शहर आणि तालुका परिसरात म सळधार पाऊस झाला. या पावसामुळे अणुस्कूरा घाटात भलीमोठी दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटातील रस्त्याच्या डोंगरावरील माथ्यावरून भले मोठे दगड व माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठी बंद झाला.

रातोरात धावाधाव – महाराष्ट्रात भाजप अजित रस्ता सायंकाळी घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ ठेकेदार उपेंद्र शेट्ये यांना त्यांचे पथक व आवश्यक साहित्य घेऊन बोलावण्यात आले व गुरूवारी रात्रीच दरड हटविण्यांचे काम हाती घेण्यात आले. मात्र रात्री पावसामुळे दरड हटविण्यात अड्चणी येत होत्या.

रात्रींच राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, रायपाटण दूरक्षत्राचे पोलीस हवालदार कमलाकर तळेकर, पोलीस नाईक सचिन वीर, पोलीस शिपाई कोळी, कात्रे, माने, बळीप आदी देखील घटनास्थळी पोहचले व दरड काढण्याच्या काम ाबाबत नियोजन करत त्यांनी सहकार्य केले. दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला व त्यांनी खोळंबलेली वाहतूक आंबाघाटमार्गे वळविण्याबाबतही नियोजन केले.

ब्लास्ट करुन दगड फोडले – शुक्रवारी सकाळपासूनच दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु व करण्यात आले. या ठिकाणी अडथळा ठरणारे अवाढव्य दगड ब्लास्टिंगद्वारे न फोडून काही दगड बाजुला करण्यात आले. बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासन न याठिकाणी सध्या जातीनिशी लक्ष ठेऊन आहेत. घाटातून मोठमोठ्या न दगडी रस्त्यावर आल्याने रस्त्यावरही न मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कामालाही वेळ लागत आहे. मात्र न प्रशासनाकडून याही परिस्थितीत काम युध्दपातळीवर सुरू आहे. तहसीलदार सौ. शितल जाधव यांनी शुक्रवारी सकाळी अणुस्कुरा घाटस्थळी भेट देत पाहणी केली.

एकेरी वाहतूक सुरु – शुक्रवारी सायंकाळी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर साधारणपणे शुक्रवारी सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास म्हणजेच जवळपास २४ तासांनी ही दरड पूर्णतः हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. मात्र वाहनचालकांनी घाटातून वाहन चालविताना दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular