27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriबँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ते परजिल्ह्यातील आहेत. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, मात्र पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईचे शहरातील बँकेच्या ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सूरज अमर मोटे (वय २१, रा. १७ वी गल्ली महात्माफुले भाजी मंडईच्या समोर जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व गिरीराज भजनलाल गुर्जर (वय २१, रा गांव बडेडा पोस्ट खटपुरा, जि. सवाई म्हादुपूर, राज्य राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र कुवारबाव शाखा येथे घडली. संशयितांनी धारदार हत्याराने एटीएम मशीन उचकटून एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे मिळाले नाहीत, म्हणून एटीएम मशीनचा दरवाजा व मशीनवरील कॅमेरा फोडून नुकसान करून तेथून पळ काढला.

या प्रकरणी बँकेचे शाखा मॅनेजर कैलास महादेव रहाडे (वय ३५, मुळ रा. बीड, सध्या रा. राजेंद्रनगर, थिबापॅलेस) यांनी शहर पोलिसात खबर दिली. दरम्यान, हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता आणि बँक मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ चोरट्यांना पकडण्यासाठी चक्रे फिरविली. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले होते. प्रथम पोलिसांनी शहरातील काही भाग रातोरात पिंजून काढला. पसार झालेल्या चोरट्यांच्या मुसक्या रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून आवळल्या. चोरट्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला व पैसे मिळाले नाहीत म्हणून मशीनवरील कॅमेरा फोडल्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES

Most Popular